E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव नाही : तटकरे
Samruddhi Dhayagude
30 May 2025
मुंबई, (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबतचा कुठलाही प्रस्ताव सध्या पक्षाकडे आलेला नाही आणि आमच्या विचारार्थही नाही. आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आहोत. आम्ही आघाडीतच राहणार असून या भूमिकेशी ज्यांना समरस व्हायचे असेल किंवा या भूमिकेबरोबर वाटचाल करायची असेल त्यांचे जरुर पक्षात स्वागत आहे, असे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यंतरी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भाष्य केले होते. याशिवाय शरद पवार गटातील काही आमदारांची मानसिकता अजित पवार यांच्यासोबत जाण्याची आहे, त्यामुळे शरद पवार गटाचे अजित पवार गटात विलिनीकरण होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या पाश्वर्र्भूमीवर काल पत्रकारांशी बोलताना तटकरे यांनी विलिनीकरणाची चर्चा फेटाळून लावली. ज्या क्षणापर्यंत विलिनीकरणाच्या प्रस्तावाचा साधा विचारही समोर नसताना त्याला विरोध असणे, अनुकूल असणे, प्रतिकूल असणे हा प्रश्नच उद्भवत नाही.
आज आम्ही आमच्या मूळ विचारधारेसोबतच ‘एनडीए’मध्ये सहभागी आहोत. त्यामुळे आमचा पुढचा राजकीय प्रवास त्यांच्यासोबत देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. त्यामुळे त्यात बदल होण्याचे काहीच कारण नाही, असेही तटकरे म्हणाले.
राष्ट्रवादीत २०१४ पासून भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याबाबत अनेकवेळा चर्चा झाली होती. अनेक प्रसंग, निर्णय टप्प्यापर्यंत पोहचलो होतो. परंतु, त्यावेळी निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आज आम्ही घेतलेली भूमिका आणि विलिनीकरण हे दोन ध्रुवावरील विषय दिसतात, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. भाजपसोबत जाऊन सत्तेमध्ये सहभागी होण्याचा आमचा निर्णय हा सामूहिक होता, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
Related
Articles
अमेरिकेकडून नागरिकांसाठी प्रवासी मार्गदर्शक तत्वे
13 Jun 2025
भारतीय विद्यार्थ्यांना इराण सुरक्षित पोहोचवणार
17 Jun 2025
इस्रायलचे नवे युद्ध (अग्रलेख)
16 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
कुकडी प्रकल्पात १०.६१ टक्केपाणीसाठा
18 Jun 2025
मुंबईमध्ये रस्ता खचून बस खड्ड्यात
17 Jun 2025
अमेरिकेकडून नागरिकांसाठी प्रवासी मार्गदर्शक तत्वे
13 Jun 2025
भारतीय विद्यार्थ्यांना इराण सुरक्षित पोहोचवणार
17 Jun 2025
इस्रायलचे नवे युद्ध (अग्रलेख)
16 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
कुकडी प्रकल्पात १०.६१ टक्केपाणीसाठा
18 Jun 2025
मुंबईमध्ये रस्ता खचून बस खड्ड्यात
17 Jun 2025
अमेरिकेकडून नागरिकांसाठी प्रवासी मार्गदर्शक तत्वे
13 Jun 2025
भारतीय विद्यार्थ्यांना इराण सुरक्षित पोहोचवणार
17 Jun 2025
इस्रायलचे नवे युद्ध (अग्रलेख)
16 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
कुकडी प्रकल्पात १०.६१ टक्केपाणीसाठा
18 Jun 2025
मुंबईमध्ये रस्ता खचून बस खड्ड्यात
17 Jun 2025
अमेरिकेकडून नागरिकांसाठी प्रवासी मार्गदर्शक तत्वे
13 Jun 2025
भारतीय विद्यार्थ्यांना इराण सुरक्षित पोहोचवणार
17 Jun 2025
इस्रायलचे नवे युद्ध (अग्रलेख)
16 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
कुकडी प्रकल्पात १०.६१ टक्केपाणीसाठा
18 Jun 2025
मुंबईमध्ये रस्ता खचून बस खड्ड्यात
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !